राज्यशास्त्र (राजकीय विचारांची परंपरा) by Dr. Vilas Awari, Dr. Suresh Devare
Book Summary:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (राजकीय विचारांची परंपरा - PO-C1) या पेपरच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या सुधारणांची जून २0१९ पासून अंमलबजावणी होत आहे. या सुधारित अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेले पुस्तक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत पुस्तकात राजकीय विचारांच्या परंपरेबाबत महत्त्वपूर्ण विवचेन करण्यात आले आहे. त्यामुळे या पुस्तकाचे स्वागत विद्यार्थी व प्राध्यापक करतील हा विश्वास आहे.
पुराजकीय विचारांची परंपरा प्रदीर्घ स्वरूपाची आहे. प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत राजकीय विचारांचा विकास घडून आला आहे. या विकास प्रक्रियेचे वेगवेगळे कालखंड पाडता येतात आणि या प्रत्येक कालखंडात काही प्रमुख राजकीय विचारवंतांनी आपल्या विचारांद्वारे राजकीय विचार परंपरा समृद्ध करण्यासाठी योगदान दिले. प्राचीन कालखंडाचा विचार करता प्लेटो आणि कन्फुशियस या विचारवंतांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण होते. आधुनिक कालखंडात राजकीय विचारांची परंपरा समृद्ध करण्याचे कार्य मॅकियाव्हॅली आणि रूसो यांनी पार पाडले. औद्योगिकीकरणाचा कालखंड हा राजकीय विचारांच्या निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. कारण या कालखंडात जॉन स्ट्रअर्ट मिल आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचे योगदान लाभले. महात्त्मा गांधी व फॅन्टझ फॅनान यांनी वसाहतवादी कालखंडास अनुसरून आपल्या विचारांची मांडणी केली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे या सर्व विचारवंतांच्या विचारांचा परामर्श घेण्यात आला आहे.
Audience of the Book :
This book Useful for M.A. Political Science Students.
Table of Content:
1. Ancient Era
2. Modern Era
3. Industrial Era
4. Colonial Era